web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड विधानसभा मतदारसंघात १ लाख ३४ हजार मतदारांची नावे वगळली; दावे व हरकती नोंदविण्याची संधी

 

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या प्रारूप मतदार यादीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. पुनरीक्षणापूर्वी मतदारसंघात ४ लाख ९१ हजार ९८० मतदार होते. त्यापैकी ३ लाख ५७ हजार ५७४ मतदारांचा नव्या प्रारूप यादीत समावेश करण्यात आला आहे. तर १ लाख ३४ हजार ४०६ मतदारांची नावे, म्हणजेच २७.३२ टक्के मतदारांची नावे, विविध कारणांमुळे यादीतून वगळण्यात आली आहेत.

निवडणूक विभागाच्या नोंदीनुसार नव्या प्रारूप यादीत २,८२,३६२ पुरुष, ,७४,३०५ महिला आणि ७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. याशिवाय यादीतून वगळण्यात आलेल्या नावांबाबत नागरिकांना दावे व हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.

नाव वगळले असेल तर काय करायचे?

निवडणूक विभागाने नागरिकांना आपले नाव नव्या प्रारूप मतदार यादीत आहे की नाही, याची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे. ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. त्यामुळे मतदारांनी विलंब न करता आपले नाव मतदार यादीत कायम आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत एकूण ६६,११३ सुनावण्या, ३३,६८८ ‘No Mapping’ आणि ३२,५२८ ‘Discrepancies (Anomaly)’ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सुनावणीसाठी एकूण २१ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, मुरबाड शहर आणि मुरबाड ग्रामीण भागाचा समावेश आहे.

तहसीलदार अभिजीत देशमुख यांचे आवाहन

मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची प्रत्येक नागरिकाने खातरजमा करावी. नाव वगळले गेले असल्यास किंवा नावाचा समावेश करायचा असल्यास निवडणूक आयोगाने दावे व हरकती नोंदविण्याची संधी दिली आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा,” अशी माहिती मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी दिली.

 

No comments