हत्तीच्या कानातून कानिफनाथांचा जन्म! जाधव कुटुंबीयांचा अनोखा गणेशोत्सव देखावा ; मुरबाडमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू
गौरव
शेलार / मुरबाड : ताज हॉटेलचे संचालक-मालक नरेश जाधव, ललित जाधव, दीपक जाधव
आणि किरण जाधव यांच्या राहत्या घरी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेला
अनोखा देखावा मुरबाड तालुक्यासह महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. ‘हत्तीच्या कानातून कानिफनाथांचा जन्म’ ही आगळीवेगळी संकल्पना गणपतीच्या
मखरातून साकारण्यात आली असून, हा देखावा भाविकांसाठी आकर्षणाचा
केंद्रबिंदू ठरत आहे.
जाधव
कुटुंबीयांकडून दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या संकल्पना घेऊन
आकर्षक आणि कलात्मक देखावे साकारले जातात. यंदाही त्यांनी पौराणिक संकल्पनेवर
आधारित कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाल्याचे दृश्यरूप मखरातून साकारले आहे.
देखाव्यातील कलाकुसर, मूर्तींची मांडणी आणि
सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा
देखावा नरेश जाधव यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून, मूर्तिकार मंगेश तुगावकर, यशवंत कुंभार कला मंदिर, मुरबाड, वसंत व्यापारी, नितीन देशमुख सर, शुभांगी जाधव, वैशाली जाधव, सोनाली
जाधव, वर्षा जाधव, प्रीती शेलार आणि
गिरीश जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.
या
देखाव्यासाठी दीपक जाधव, किरण जाधव, ललित जाधव, रुपेश जाधव, रजत
पालवी, राजेश जाधव, भाऊ गोंधळी,
जगू जाधव आणि सागर लिंगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच
राधाबाई जाधव, कलावती जाधव, मनीषा जाधव, गुणू शेलार, विद्या
जाधव, सुरेखा जाधव, सविता जाधव,
संज्योती जाधव, प्रज्योत जाधव, आर्या जाधव, आराध्या जाधव, राखी
जाधव, पंकज जाधव, साईराज जाधव, ओम जाधव, अमर जाधव, मंथन जाधव,
बाबू जाधव तसेच समस्त उगळी यांनीही देखावा साकारण्यासाठी मोलाचे
सहकार्य केले.
दरवर्षी
नवनवीन संकल्पना आणि कलात्मक मांडणीच्या माध्यमातून गणेशभक्तांना वेगळा अनुभव
देण्याचा जाधव कुटुंबीयांचा प्रयत्न असतो. यंदाचा ‘हत्तीच्या कानातून कानिफनाथांचा जन्म’ हा देखावा त्याच परंपरेतील
आगळावेगळा प्रयोग ठरला आहे.हा अनोखा देखावा मुरबाडकरांनी आवर्जून पाहावा आणि
गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नरेश जाधव, ललित जाधव व त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.



No comments