मुरबाडमध्ये पोलिसांसाठी फिजिओथेरपी व PGO थेरेपी कॅम्प
गौरव शेलार / मुरबाड : स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व मुरबाड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड्स यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी फिजिओथेरपी व PGO थेरेपी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
या कॅम्पमध्ये डॉ. मयुरी हरड यांनी कंबर, पाठ, मान, गुडघे व खांदेदुखी तसेच स्नायूंवरील ताण कमी करण्यासाठी आवश्यक व्यायाम व स्ट्रेचिंगचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. दैनंदिन कर्तव्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक समस्यांपासून बचाव करण्यासाठी योग्य व्यायाम व शरीराची ठेवण याबाबतही माहिती देण्यात आली.
उपस्थित पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड्स यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत व्यायामाचे प्रात्यक्षिक केले. “निरोगी पोलीस दल – सक्षम पोलीस दल” या उद्देशाने आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. यावेळी मुरबाड पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. मयुरी हरड यांचे आभार मानण्यात आले.

.jpeg)

No comments