web-banner-lshep2024

Breaking News

नूतनीकरणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश; जुन्या तहसील कार्यालयात ‘आधारवड’ वृक्षाची लागवड

गौरव शेलार / मुरबाड : आज जुन्या तहसील कार्यालय येथे सुरू असलेल्या नूतनीकरण कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी कार्यालयाच्या आवारात ‘आधारवड’ वृक्षाची लागवड करण्यात आली.या वृक्षास तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी आपल्या आईचे नाव ‘अरुणा’ दिले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच आईच्या स्मृतीला एक अनोखी आदरांजली देण्यात आली.

जुन्या तहसील कार्यालयाच्या नूतनीकरणामुळे परिसराला नवे स्वरूप प्राप्त होणार असून, कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. कार्यालयीन परिसरात वृक्षारोपण केल्याने पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होण्यासही मदत होणार आहे.‘आधारवड’ संकल्पनेतून लावण्यात आलेले हे वृक्ष भविष्यात परिसरातील नागरिकांसाठी सावली, ऑक्सिजन आणि पर्यावरण संवर्धनाचा आधार ठरणार आहेत.

 

No comments