स्वातंत्र्य दिनानिमित्त मनसे मुरबाड शहराचा विद्यार्थ्यांसोबत अनोखा उपक्रम
गौरव शेलार / मुरबाड : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मुरबाड शहराच्या वतीने विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणित करणारा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व राजूनगर परिसरातील विद्यार्थ्यांना बिस्कीट व चॉकलेटचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
या उपक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता मुरबाड नगरपंचायत येथून करण्यात आली. त्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, संभाजीनगर येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मनसे मुरबाड शहराध्यक्ष देवेंद्र जाधव, शहर सचिव कल्पेश गायकवाड, शहर संघटक कीर्ती गोहिल, विभागाध्यक्ष अकेश जाधव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. बिस्कीट व चॉकलेट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मनसे मुरबाड शहराच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
‘स्वातंत्र्य दिन केवळ उत्सव न राहता समाजाशी जोडले जाण्याचा दिवस ठरावा’, या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांसोबत नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले.


.jpeg)

No comments