web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड ग्रामीण रुग्णालयास उपनगराध्यक्षा सौ.नम्रता नितीन तेलवणे यांची भेट;अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर राहणार

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ.नम्रता नितीन तेलवणे यांनी मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयातील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला.

यावेळी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करताना रुग्णांना मिळणाऱ्या उपचार सुविधा, अत्यावश्यक सेवा तसेच आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांबाबत माहिती जाणून घेण्यात आली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय हे महत्त्वाचे आरोग्य केंद्र असल्याने येथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे मत उपनगराध्यक्षा नम्रता तेलवणे यांनी व्यक्त केले.

मुरबाडच्या नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू. ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या आणि आवश्यक बाबी संबंधित स्तरावर मांडून त्यासाठी पाठपुरावा केला जाईल,”असे यावेळी सौ. नम्रता नितीन तेलवणे यांनी सांगितले.

नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

No comments