सैनिकांच्या आई-वडिलांचा सन्मान; गुणवंतांचा गौरव
गौरव शेलार / मुरबाड : संघर्ष पत्रकार संस्था, ठाणे जिल्हा यांच्या वतीने मुरबाड येथील माऊली गार्डन येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय सीमेवर देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या आई-वडिलांचा सन्मान तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांच्या आयोजनातून झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, धार्मिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमातून सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.



No comments