मुरबाडमध्ये तळीराम वाहनचालकांवर पोलिसांचा दणका; गटारीच्या पार्श्वभूमीवर ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’वर करडी नजर
गौरव शेलार / मुरबाड : गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मुरबाड शहर आणि परिसरात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर पोलिसांची विशेष नजर असून, शहरातील प्रमुख रस्त्यांसह महत्त्वाच्या चौकांमध्ये तपासणी सुरू करण्यात आली आहे.
गटारीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक मद्यप्राशन करून वाहनाने बाहेर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात असून, अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना मद्यपान करून वाहन न चालविण्याचे आवाहन केले आहे.
‘दारू पिऊन गाडी चालवली तर कारवाई अटळ!’ असा इशारा पोलिसांनी दिल्याने तळीराम वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. गटारीच्या पार्श्वभूमीवर मुरबाड पोलिसांची ही कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.



No comments