web-banner-lshep2024

Breaking News

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमदार किसन कथोरे यांच्याकडून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन

 

गौरव शेलार / बदलापूर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त बदलापूर गाव येथील ठाकूरवाडी येथे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास आमदार किसन कथोरे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचे स्मरण करत आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि न्यायासाठी दिलेला संघर्ष हा आजही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांमधून आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते, असे आमदार किसन कथोरे यांनी यावेळी सांगितले.

“आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना आणि विकासकामांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू,” असा विश्वास आमदार कथोरे यांनी व्यक्त केला. आदिवासी बांधवांच्या हक्कांचे संरक्षण, मूलभूत सुविधा तसेच शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या संधी यांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षातून प्रेरणा घेत आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकजुटीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी उपस्थितांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ.रुचिताताई राजेंद्र घोरपडे, तेजस (बंटी) म्हसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

 

No comments