लीज धारकांसाठी भव्य जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ; आमदार किसन कथोरे यांची राहणार उपस्थिती...
कुणाल शेलार/मुरबाड : मुरबाड शहरातील भोगवटादार वर्ग-२ अंतर्गत लीज धारकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने भव्य जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर शुक्रवार,दि.७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता,कुणबी समाज हॉल,मुरबाड येथे होणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या नवीन सुधारणांच्या पार्श्वभूमीवर लीज धारकांना त्यांच्या जमिनीवरील हक्क,नवीन कायदेशीर बदल,तसेच पुढील कार्यवाहीची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.यामुळे नागरिकांच्या अनेक शंकांचे निरसन होऊन आवश्यक प्रशासकीय प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होणार आहे.या शिबिरात भोगवटादार वर्ग-२ धारकांचे अधिकार, नवीन अध्यादेशाचे स्वरूप,लीज जमिनीचे नियमितीकरण,जमिनीवरील हक्क,मुक्तीकरण प्रक्रिया तसेच हस्तांतरणासंबंधी शिथिलता आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.तसेच शासनाच्या योजनांशी संवाद साधून विविध समस्यांवर उपाययोजनाही सुचविण्यात येणार आहेत.या महत्त्वपूर्ण शिबिराचा लाभ मुरबाड शहरातील सर्व लीज धारकांनी घ्यावा,असे आवाहन आयोजक तथा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.



No comments