web-banner-lshep2024

Breaking News

मुसळधार पावसामुळे मुरबाड शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम ; नागरिकांना पाणी गाळून व उकळून वापरण्याचे आवाहन

 

कुणाल शेलार / मुरबाड : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुरबाड शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात मुरबाड नगरपंचायतीने नागरिकांसाठी महत्त्वाची सार्वजनिक सूचना जारी केली आहे.

    नगरपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार,मुरबाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाकूरवाडी-शिरवली धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणकडील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा प्रभावित होत असून,शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.तसेच, अतिवृष्टीमुळे काही भागांत पाणी गढूळ येण्याचीही शक्यता असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून आणि उकळूनच वापरावे,असे आवाहन मुरबाड नगरपंचायतीने केले आहे. 

    आरोग्याची काळजी घेण्याचे तसेच नगरपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.पावसाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि पाण्याचा जपून वापर करावा, असेही मुरबाड नगरपंचायतीने आवाहनासह स्पष्ट केले आहे.

 

No comments