web-banner-lshep2024

Breaking News

समाजसेवेचा दीप अखंड तेवत ठेवणारे तानाजीभाऊ मोरे

 

कुणाल शेलार / भिवंडी : समाजसेवा ही केवळ उपक्रमांची मालिका नसून ती आयुष्याची साधना आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे देवा ग्रुप फाऊंडेशनचे राज्य सचिव डॉ.तानाजीभाऊ मोरे.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रासह राज्याबाहेरील असंख्य सामाजिक कार्यकर्ते, युवक, हितचिंतक आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

देवा ग्रुप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पप्याभाई ढोले व सचिव डॉ.तानाजीभाऊ मोरे यांनी समाजसेवेचा एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. गाव, खेडी, शहर, तालुके, जिल्हे आणि राज्यभरातील गरजू, वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो नव्हे तर लाखो युवक समाजसेवेची प्रेरणा घेऊन विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.

देवा ग्रुप फाऊंडेशनची कार्यपद्धती ही केवळ प्रसिद्धीपुरती नसून प्रत्यक्ष कृतीवर आधारित आहे. कोणाचाही वाढदिवस आल्यानंतर मोठ्या पार्ट्या किंवा अनावश्यक खर्च न करता शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, रुग्णांना वैद्यकीय सहाय्य, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. पावसाळ्यात पोलीस कर्मचारी व इतर सेवाभावी कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप, गरजूंना छत्र्यांचे वितरण अशा अनेक उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली जाते.

तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांना आवश्यक कागदपत्रे, मार्गदर्शन आणि प्रशासकीय मदत मिळावी यासाठीही फाऊंडेशन सातत्याने पुढाकार घेत असते. अनेक गरजू नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ.तानाजीभाऊ मोरे आणि त्यांची देवा ग्रुप फाऊंडेशन टीम सातत्याने प्रयत्नशील असते.

यापूर्वीही तानाजीभाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि गरजूंसाठी सहाय्य कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची नोंद विविध वृत्तमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आयोजित निवासी शिबिरांसारख्या उपक्रमांमध्येही त्यांनी मार्गदर्शक म्हणून योगदान दिले आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांनी सुरू ठेवलेली समाजसेवेची वाटचाल अधिक व्यापक व्हावी, त्यांच्या हातून आणखी अनेक जनहिताचे उपक्रम घडावेत आणि देवा ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक गरजूंना आधार मिळावा, अशाच भावना सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.

          आज डॉ.तानाजीभाऊ मोरे यांचे वाढदिवस असून त्यांना आमच्या वृत्तपत्र तसेच आमच्या वृत्तवाहिनी कडून  वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या सामाजिक कार्याला उत्तरोत्तर यश लाभो,हीच सदिच्छा.

No comments