पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, डॉ.प्रमोद हिंदुराव,मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह अन्य पाहुण्यांची हजेरी
गौरव शेलार / पुणे : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचे चिरंजीत पार्थ पवार यांचा साखरपुडा सोहळा आज पु्ण्यात पार पडला. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. या सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व मान्यवर उपस्थित होते.
पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुडा सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष तथा माजी सिडको अध्यक्ष डॉ. प्रमोद हिंदुराव, ज्योतीताई हिंदुराव यांच्यासह इतर राष्ट्रवादीचे बडे नेते हजर होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या लग्नाची घोषणा झाली होती. याआधी कायनात आणि पार्थ पवार हे रेवती सुळे यांच्या लग्नात एकत्र दिसले होते.




No comments