पावसाळी अधिवेशनात आमदार किसन कथोरे यांचा कुळगाव-बदलापूरच्या महापालिका दर्जासाठी जोरदार पाठपुरावा
कुणाल शेलार / मुरबाड
: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुरबाड
विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेला
महापालिकेचा दर्जा देण्याची मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात प्रभावीपणे
मांडली. वाढत्या लोकसंख्येचा आणि झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणाचा विचार करता
शासनाने प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी अध्यक्षांमार्फत
शासनाकडे केली.
सभागृहात बोलताना आमदार कथोरे म्हणाले की, कुळगाव-बदलापूर नगरपालिका
परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून लोकसंख्या
सुमारे पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहराचा विस्तार वेगाने होत असल्याने
लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रांवरही विकासाचा ताण वाढत आहे. यामुळे अनधिकृत व
बेकायदेशीर बांधकामांना चालना मिळण्याची भीती निर्माण झाली आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या हद्दवाढीचा
प्रस्ताव गेल्या दहा-बारा वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित असून त्यावर अद्याप
कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. शहराच्या वाढत्या गरजा, नियोजनबद्ध विकास आणि
नागरिकांना अधिक सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रस्ताव तातडीने
मंजूर करून नगरपालिकेला महापालिकेचा दर्जा देणे अत्यावश्यक असल्याचे आमदार कथोरे
यांनी अधोरेखित केले.सभागृहातील या मागणीद्वारे त्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेत,
अध्यक्षांच्या माध्यमातून संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करून
प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती केली.
दरम्यान, मुरबाड विधानसभा मतदारसंघासह ठाणे जिल्ह्यात विविध
विकासकामांचा धडाका लावणारे आमदार किसन कथोरे यांना त्यांच्या आक्रमक आणि
विकासाभिमुख कार्यशैलीमुळे "ठाणे जिल्ह्याचा वाघ" अशी ओळख मिळाली आहे.
नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत
महायुतीच्या उमेदवारांना एकत्रितपणे विजय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची
भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने एकहाती यश संपादन करत राजकीय
ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

.jpeg)

No comments