web-banner-lshep2024

Breaking News

सर्वशिक्षा अभियानातील गणवेश शिवणाऱ्या टेलर्सना प्रति ड्रेस ४०० रुपये द्या; पत्रकार कुणाल शेलार यांची राज्य शासनाकडे मागणी...

 

मुरबाड/प्रतिनिधीः राज्यात सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश शिवणाऱ्या टेलर्सना सध्या प्रति ड्रेस केवळ ३०० रुपये मानधन दिले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याने शिवणकाम करणाऱ्या टेलर्सवर आर्थिक संकट ओढवले आहे. वाढती महागाई,कापड,दोरा,वीज,भाडे तसेच इतर खर्च लक्षात घेता सध्याचा दर अत्यंत अपुरा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर पत्रकार कुणाल शेलार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधत सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिवल्या जाणाऱ्या प्रत्येक शालेय गणवेशासाठी दिली जाणारी रक्कम ३०० रुपयांवरून ४०० रुपये करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे.

पत्रकार शेलार यांनी म्हटले आहे की,आजच्या महागाईच्या काळात केवळ ३०० रुपयांत टेलर्सना योग्य मोबदला मिळत नाही.शिवणकामासाठी लागणारा वेळ,मेहनत आणि वाढलेले उत्पादन खर्च यांचा विचार करता शासनाने वास्तववादी निर्णय घेऊन दरवाढ करणे आवश्यक आहे.या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून,शासनाने त्यांच्याप्रती संवेदनशील भूमिका घ्यावी,असेही त्यांनी नमूद केले.दरवाढीचा निर्णय घेतल्यास राज्यातील हजारो टेलर्सना दिलासा मिळेल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय गणवेश उपलब्ध करून देण्यासही प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रति गणवेश शिवणकामाचा दर ४०० रुपये निश्चित करावा,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments