४२ वर्षांच्या शैक्षणिक सेवेला मानाचा मुजरा; मुख्याध्यापिका सौ.सुमन कांताराम घाडगे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा
ओतूर/कुणाल शेलार: श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रम शाळा,ओतूर येथील मुख्याध्यापिका सौ.सुमन कांताराम घाडगे यांच्या ४२ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेबद्दल सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन शुक्रवार,३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री गाडगे महाराज शिक्षण संकुल,ओतूर येथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.नागराज महाराज डुंबरे (अध्यक्ष, संत गाडगे बाबा शिक्षण परिषद,जुन्नर तालुका) हे राहणार आहेत.प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. अनिलशेठ श्रीकृष्ण तावरे (अध्यक्ष,प्रा.शि.मंडळ,ओतूर) तसेच श्री.किरण प्रल्हादराव पाटील (शालेय व्यवस्थापन समिती सदस्य) उपस्थित राहणार आहेत.
सौ.घाडगे यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला असून,शिक्षणप्रेमी,माजी विद्यार्थी,पालक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

.jpeg)

No comments