web-banner-lshep2024

Breaking News

स्व. अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त म्हसा महाविद्यालयात अभिवादन

 

मुरबाड : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त सौ. कमलताई किसन कथोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, म्हसा येथे बुधवारी (दि. २२ जुलै) अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश माळी आणि वरिष्ठ लिपिक निलेश शिंदे यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी प्राचार्य योगेश माळी यांनी आपल्या मनोगतात स्व. अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा आढावा घेत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव केला. तसेच प्रा. संकेत वाढविंदे यांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. विजय सोनार यांनी केले.अभिवादन कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी स्व. अजितदादा अनंतराव पवार यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन केले.

 

No comments