म्हसा महाविद्यालयात ‘सायबर स्कॅम जागरूकता’ विषयावर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना फसवणुकीपासून बचावाचे धडे
गौरव शेलार / मुरबाड
:
वाढत्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर
सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सौ. कमलताई किसन कथोरे कला,
वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, म्हसा येथे
वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २० जुलै २०२६
रोजी ‘सायबर स्कॅम जागरूकता’ या
विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम स्वाधार फिनॲक्सेस यांच्या माध्यमातून
संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. योगेश माळी
होते. प्रमुख अतिथी म्हणून अभिषेक पवार (प्रमुख जिल्हा
व्यवस्थापक, ठाणे, बँक ऑफ महाराष्ट्र),
अश्विनी ठोसर (मास्टर ट्रेनर, स्वाधार फिनॲक्सेस), सोनाली
स्थूल (जिल्हा प्रभारी, ठाणे
व रायगड, स्वाधार फिनॲक्सेस) तसेच मोनिका जाधव (ट्रेनर,
मुरबाड ब्लॉक, स्वाधार फिनॲक्सेस) उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची
सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या विविध आर्थिक व जनकल्याणकारी
योजनांची माहिती देण्यात आली. तसेच ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, बनावट
कॉल, फिशिंग, ओटीपी फसवणूक, बनावट गुंतवणूक योजना, सोशल मीडिया स्कॅम यांसारख्या
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याविषयी
सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास तक्रार नोंदविण्याची
प्रक्रिया आणि उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणेची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात
आली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत
उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधानकारक
निरसन केले. व्याख्यानाच्या शेवटी आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत
विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन
गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवनदीप शैक्षणिक
संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, संचालिका स्मिता
घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे तसेच
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. योगेश माळी यांचे विशेष मार्गदर्शन
लाभले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. हर्षदा पवार,
प्रा. दीक्षा बोटकुंडले, प्रा. विजय सोनार तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दीपक शेळके आणि महाविद्यालयातील सर्व
प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. विजय सोनार
यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते. सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणारे हे व्याख्यान
विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त
केली.



No comments