स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कुकसे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
गौरव शेलार / भिवंडी : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार
यांच्या जयंतीनिमित्त आज (बुधवार, दि. २२ जुलै २०२६)
भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, कुकसे येथे राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या
मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रतिक
प्रमोद हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, भिवंडी तालुका ग्रामीणचे अध्यक्ष दिलशाद सिकंदर शेख यांच्या वतीने
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेला स्वर्गीय
अजितदादा पवार यांची प्रतिमा भेटस्वरूपात प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना दिलशाद शेख म्हणाले, "स्वर्गीय अजितदादा पवार यांनी समाजातील
सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य
केले. त्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून
त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. शिक्षण हीच
समाजपरिवर्तनाची खरी ताकद असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही प्रत्येकाची
सामाजिक जबाबदारी आहे."
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
शालेय साहित्य व खाऊचे वितरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आयोजकांचे
आभार मानले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, भिवंडी तालुका ग्रामीणचे
अध्यक्ष दिलशाद सिकंदर शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रेम
पाटील, योगेश मागे, अजय
पाटील, आर्यन पाटील, तसेच
शाळेचे शिक्षक जयराम पाटील सर, पुरुषोत्तम मंडलिक सर
आणि लताबाई दरेकर मॅडम उपस्थित होते.
याशिवाय कुकसे गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि शाळेतील विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांनी
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या
कार्याला विनम्र अभिवादन केले.



No comments