गुणात्मक गुन्हे अन्वेषणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस उपायुक्त प्रसाद डी.पांढरे यांच्यासह ४६ पोलीस अधिकारी-अंमलदारांचा गौरव
कुणाल शेलार/मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाने जानेवारी ते जून २०२३ या कालावधीत गुणात्मक गुन्हे अन्वेषणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा विशेष गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. "गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न" तसेच "सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत" या दोन विभागांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण ४७ पोलीस अधिकारी व अंमलदारांची निवड करण्यात आली आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी केलेल्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार प्रशस्तिपत्र, 'सी' नोट अथवा जीएसटी (Good Service Token) देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या यादीमध्ये ठाणे शहर, रायगड, बुलढाणा, वर्धा, नाशिक शहर, ठाणे ग्रामीण, भंडारा, पुणे शहर आदी जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ठाणे ग्रामीणच्या मुरबाड पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासासाठी पोलीस निरीक्षक प्रसाद डी.पांढरे यांच्यासह संबंधित पथकाचीही गौरवासाठी निवड करण्यात आली आहे.
मुरबाड पोलीस ठाण्यातर्गत डॉ.बेंढारी यांचे किडन्यापिंग(अपहरण)आणि खंडणी दाखल गुन्ह्यात कोणताही केस धाग्याचा पुरावा नसताना उत्कृष्ट तपास करून गुन्हा उघडकीस आणला म्हणून CID महाराष्ट्र शिफारसी वरून संपुर्ण महाराष्ट्रात एकून 7 गुन्हे निवडले आहेत त्यात मुरबाडच्या या केसची महत्वाची नोंद झाली असून या तपासासाठी पोलीस निरीक्षक प्रसाद डी.पांढरे यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याची दाखल राज्य पोलीस वरिष्ठ अधिकारी यांनी घेतली.
पोलीस महासंचालक कार्यालयाने संबंधित पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांना या अधिकाऱ्यांचा योग्य सन्मान करून त्यांच्या सेवा अभिलेखात नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच उत्कृष्ट गुन्हे अन्वेषणाची ही प्रकरणे संबंधित आयुक्तालय व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.या निर्णयामुळे उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून, राज्यातील गुन्हे अन्वेषणाची गुणवत्ता आणखी उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून आजचे पोलीस उपायुक्त प्रसाद डी.पांढरे यांचे मुरबाडसह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



No comments