web-banner-lshep2024

Breaking News

आजची महिला रणरागिणी ; ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला 'माहेर'चा आधार

 

कुणाल शेलार / मुरबाड : ग्रामीण भागातील नागरिकांना शहरांप्रमाणे अत्याधुनिक, दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळावी, महिलांना सुरक्षित उपचार मिळावेत, नवजात बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध व्हावी आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचावा, या सामाजिक भावनेतून माहेर हॉस्पिटल अँड नर्सिंग होमच्या संचालिका डॉ.स्नेहल स्वप्नील वाकचौरे यांनी मुरबाड शहरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे 'माहेर हॉस्पिटल अँड नर्सिंग होम' उभारले आहे.

"माहेर" हे नाव जरी महिलांच्या आपुलकीचे प्रतीक असले, तरी हे रुग्णालय केवळ महिलांसाठी नसून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले असून, आज मुरबाडसह परिसरातील हजारो नागरिकांचे विश्वासाचे आरोग्यकेंद्र बनले आहे. दिवस असो किंवा मध्यरात्र, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची पहिली धाव आज माहेर हॉस्पिटलकडेच होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचारी प्रत्येक रुग्णाला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जिव्हाळ्याने सेवा देताना दिसतात. त्यामुळे या रुग्णालयाने अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.

"प्रगत काळजी, सर्व विशेषता, एक रुग्णालय" हीच ओळख

माहेर हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, स्वच्छ व सुसज्ज वातावरण आणि २४ तास उपलब्ध असलेली आपत्कालीन सेवा यामुळे रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत आहेत. रुग्णालयात स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात आले असून प्रत्येक विभागात आरोग्यविषयक उच्च दर्जाचे निकष पाळले जातात.

बांधकाम कामगारांसाठी शासनाची मोठी योजना; अनेक शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

माहेर हॉस्पिटलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना विविध शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

 

या योजनेअंतर्गत प्रसूती, सिझेरियन प्रसूती, वैद्यकीय गर्भपात, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढणे, दुर्बिणीद्वारे अंडाशयातील गाठी काढणे, अस्थानिक गर्भधारणा, खराब गर्भ काढणे, मूळव्याध व भगंदर, अपेंडिक्स, हर्निया, शरीरावरील विविध गाठी काढणे, पित्ताशय शस्त्रक्रिया, प्रोस्टेट ऑपरेशन, अंडकोषावरील शस्त्रक्रिया, आतड्यांचे आजार तसेच व्हेरीकोज व्हेनसारख्या अनेक शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत कार्ड, KYC पावती, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहे.

एकाच छताखाली अनेक तज्ज्ञ सेवा

माहेर हॉस्पिटलमध्ये प्रसूतीगृह (Maternity Home), वंध्यत्व क्लिनिक, जनरल सर्जरी, अस्थिरोग विभाग, बालरोग विभाग, जनरल मेडिसिन, नेत्ररोग क्लिनिक, त्वचारोग क्लिनिक, ईसीजी, पॅथॉलॉजी, फोटोथेरपी, एक्स-रे तसेच डायटिशियन (Dietitian) अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत नाही.

बालरोगतज्ज्ञ डॉ.वैभव घाडगे यांची २४ तास सेवा

माहेर हॉस्पिटलमध्ये बालरोग व नवजात शिशुरोग तज्ज्ञ डॉ. वैभव घाडगे (एम.डी.) यांची सेवा उपलब्ध आहे. नवजात बालके आणि लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लहान मुलांची संपूर्ण तपासणी, आवश्यक असल्यास दाखल करण्याची सुविधा, नवजात बाळांसाठी कावीळवरील फोटोथेरपी, सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, न्युमोनिया, दमा, आकडी, बालकफ, बालदमा यांसारख्या आजारांवर उपचार, नेब्युलायझेशन सुविधा, मुलांच्या वाढीचे मार्गदर्शन, योग्य आहाराविषयी सल्ला तसेच सर्व प्रकारचे आधुनिक लसीकरण येथे उपलब्ध आहे.

यामुळे मुरबाडसह ग्रामीण भागातील पालकांना आपल्या मुलांच्या उपचारासाठी दूरच्या शहरात जाण्याची गरज उरलेली नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर निदान, त्वरित उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे अनेक बालरुग्ण लवकर बरे होत असल्याचा सकारात्मक अनुभव त्यांना आला आहे.

२४ तास सेवा – नागरिकांसाठी मोठा दिलासा

रुग्णालयाची नियमित ओपीडी सकाळी १० ते दुपारी २ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सुरू असते. मात्र आपत्कालीन परिस्थितीत २४ तास सेवा उपलब्ध असल्याने अपघात, प्रसूती, बालरुग्ण किंवा इतर गंभीर रुग्णांना कोणत्याही वेळी उपचार मिळत आहेत.

कौटुंबिक नात्याने रुग्णसेवा

माहेर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाकडे केवळ रुग्ण म्हणून नव्हे, तर कुटुंबातील सदस्य म्हणून पाहिले जाते. डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचारी रुग्णांशी प्रेमाने संवाद साधतात, त्यांच्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन करतात आणि उपचारादरम्यान मानसिक आधारही देतात. हीच या रुग्णालयाची वेगळी ओळख बनली आहे.

लवकरच ३५ हून अधिक कॅशलेस आरोग्य योजनांची सुविधा

सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी लवकरच ३५ हून अधिक कॅशलेस आरोग्य योजनांची सुविधा माहेर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती कळून येत असून यामुळे विविध शासकीय आणि विमा योजनांअंतर्गत पात्र नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे.

ग्रामीण भागात आधुनिक आरोग्यसेवेचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ.स्नेहल स्वप्नील वाकचौरे यांनी उभारलेले माहेर हॉस्पिटल आज मुरबाड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. महिलांपासून नवजात बालकांपर्यंत, तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकासाठी अत्याधुनिक उपचार, सेवाभावी वृत्ती, शासनाच्या कल्याणकारी योजना आणि २४ तास तत्पर सेवा या बळावर माहेर हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने हे रुग्णालय आज खऱ्या अर्थाने आरोग्याचे "माहेरघर" बनले आहे.

No comments