अनधिकृत गौणखनिज वाहतुकीवर महसूल विभागाचा दणका; डंपर जप्त
गौरव शेलार / मुरबाड :मुरबाड तालुक्यात अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.याच अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार साजई रोड येथे जप्त करण्यात आलेल्या एका डंपर वाहनास दंडाची रक्कम शासनाकडे भरल्यानंतर सोडून देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी,कल्याण यांनी दिले आहेत.
एमएच 04 जीए 7572 क्रमांकाचा डंपर अनधिकृत गौणखनिज वाहतुकीप्रकरणी जप्त करण्यात आला होता. संबंधित वाहनमालकावर गौणखनिजाच्या वैयक्तिक जातमुचलका वाहनांच्या शास्तीची रक्कम एकूण 1 लाखांचा (बॉन्ड) आणि गौणखनिज दंड शास्ती 1 लाख 34 हजार 325 रूपये निश्चित करण्यात आले.अभिजीत देशमुख यांच्या भरारी पथकानेहि कामगिरी केली असून शासनाच्या आदेशानुसार निर्धारित दंडाची रक्कम शासन खात्यात जमा केल्यानंतर वाहन मुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार मुरबाड यांना पाठविण्यात आलेल्या आदेशात,संबंधित वाहनमालकाने आवश्यक दंड भरल्याने तहसील कार्यालयात जप्त असलेले वाहन सोडण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महसूल विभागाकडून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून,नियमांचे उल्लंघन करणार्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.महाराष्ट्रात अशा प्रकरणांमध्ये महसूल विभागाकडून दंड, वाहन जप्ती आणि पुढील कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.त्याचबरोबर सदर या अगोदर मुरबाड तालुक्यात असे अनेक अनधिकृत गौणखनिजे प्रकार घडलेल्या असून काहींवर दंडात्मक जप्तीची कारवाई झालेली आहे परंतु फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल अलीकडे होत नसल्याने टोकावडेसह माळशेज घाट माथ्याजवळ छुप्पे पध्दतीने दुर्मीळ भागासह काहि ठिकाणी हे पथक पाहोचत नसल्याने रॉयल्टी व गौणखनिजे राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्रारी होत्या परंतु कारवाई होत नाही त्यामुळे अवैध गौणखनिज उत्खनन करणारा पुन्हा पुन्हा काहींना हाताशी धरून खुलेआम अवैध उत्खनन करित आहे हे म्हणणं वावगं ठरणार नाही त्यामुळे अशा गैणखनिज उत्खनन करणार्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई होणे अपेक्षित आहे अशी चर्चा आता या प्रकारामुळे होत आहे.



No comments