‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ आणि ‘आई महोत्सव 2026’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
नामदेव शेलार / मुरबाड : राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टी,ठाणे
जिल्हा अंतर्गत प्रियजन गुणगौरव समितीच्या वतीने मुरबाड येथे ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ आणि ‘आई महोत्सव 2026’
या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा सन्मान सोहळा
शनिवार, दि.11 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता माऊली गार्डन हॉल, म्हसा रोड, मुरबाड येथे उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमामध्ये दहावी,बारावी
तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणार्या गुणवंत
विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आह. विद्यार्थ्यांच्या यशामागे निःस्वार्थपणे
उभ्या राहिलेल्या मातांचा ‘मातृशक्तीचा सन्मान सोहळा’ या विशेष उपक्रमांतर्गत
सन्मान करण्यात येणार असून,भविष्य घडवणार्या महामातेचा
सन्मान ही संकल्पना या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे.
या कार्यक्रमासाठी
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा.सुनेत्रा अजित पवार प्रमुख पाहुण्या म्हणून
उपस्थित राहणार असून,त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार आणि
मातृशक्तीचा गौरव केला जाणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.प्रमोद विनायक हिंदुराव राहणार
आहेत. यावेळी पक्षाचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी,विविध
क्षेत्रातील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख
आयोजन म्हणून डॉ.प्रमोद विनायक हिंदुराव (उपाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश),सौ.ज्योती प्रमोद हिंदुराव (माजी जिल्हा
परिषद सदस्या,ठाणे),श्री.प्रतीक प्रमोद
हिंदुराव (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी,
ठाणे ग्रामीण) आणि कु.सौरभ प्रमोद हिंदुराव (उद्योजक) यांनी केले
आहे.
विद्यार्थ्यांना
प्रोत्साहन देणे,त्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणे आणि मातांच्या
त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे
आयोजकांनी आमच्याशी बोलतांना सांगितले.मुरबाड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी,पालक,माता आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित
राहून या सन्मान सोहळ्याची शोभा वाढवावी,असे आवाहन प्रियजन
गुणगौरव समिती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केले आहे.गुणवंत
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि मातृशक्तीच्या योगदानाचा सन्मान अशा दुहेरी
उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम मुरबाड तालुक्यात सामाजिक व शैक्षणिक
क्षेत्रात प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

.jpeg)

No comments