web-banner-lshep2024

Breaking News

टीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी अरुण पाटील यांची निवड;सर्वत्र अभिनंदनाचा वर्षा...

 


कुणाल शेलार/मुरबाड : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसी) बँकेच्या अध्यक्षपदी श्री.अरुण पाटील यांची तर उपाध्यक्ष म्हणून सौ.भाग्यश्री निलेश भोर यांची बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सहकार पॅनेल क्षेत्राच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.

सहकार क्षेत्रातील अनुभव,संघटन कौशल्य आणि सर्वसामान्य सभासदांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि आमदार किसन कथोरे यांचे खंदे समर्थक म्हणून अरूण पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे बोलले जात आहे.यावेळी आमदार कथोरे यांनी टीडीसी बँकेची प्रगती अधिक वेगाने होईल,तसेच सभासद व ग्राहकांचा विश्‍वास अधिक दृढ होईल,असा विश्‍वास मला आहे असे आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.यावेळी आमदार किसन कथोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मान्यवरांनी अध्यक्ष अरूण पाटील व उपाध्यक्ष सौ.भाग्यश्री भोर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.त्याचबरोबर सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणार्‍यांचीही मोठी संख्या पाहायला मिळाली.नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर बँकेच्या विकासाला चालना देणे,पारदर्शक कारभार आणि सभासदाभिमुख निर्णयांना प्राधान्य देण्याचा निर्धार अरुण पाटील व उपाध्यक्ष सौ.भाग्यश्री भोर यांनी व्यक्त केल्याची भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली.सदर निवडणूक प्रक्रिया पध्दतीने मतदान झाले असताना आमदार किसन कथोरे यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांपैकी 14 मते मिळाली तर विरोधी 7 मते मिळाल्याने आमदार किसन कथोरे यांचा जादूचा चष्मा पुन्हा सर्वांनी पाहिल्याने एकहाती वर्चस्व अखेर मिळाले असल्याची खात्रीलायक सुत्रांकडून माहिती कळून येत आहे.

          "सहकार पॅनेल क्षेत्रातून नवी दिशा देणारे नेतृत्व"

टीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी श्री.अरुण  पाटील व सौ.भाग्यश्री निलेश भार यांची निवड झाल्याने ठाणे जिल्ह्यातील सहकार पॅनेल क्षेत्रातुन नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून,त्यांच्या पुढील कार्यकाळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments