web-banner-lshep2024

Breaking News

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुरबाड नगरपंचायत सतर्क; मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज...

 

कुणाल शेलार / मुरबाड : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देता यावा, यासाठी मुरबाड नगरपंचायतीने संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली आहे. मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी निश्चित करून आपत्ती व्यवस्थापनासाठी कंबर कसली आहे.

मुरबाड नगरपंचायतीच्या वतीने शहरातील पूरस्थिती निर्माण होऊ शकणारे भाग, नाले, गटारे, रस्ते तसेच इतर संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले आहे. कोणत्याही क्षणी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदतकार्य सुरू करता यावे, यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वयही वाढविण्यात आला आहे.मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, आपत्कालीन परिस्थितीत नगरपंचायतीशी त्वरित संपर्क साधण्याचेही सांगितले आहे.पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मुरबाड नगरपंचायतीची संपूर्ण यंत्रणा २४ तास सज्ज असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

No comments