web-banner-lshep2024

Breaking News

सरळगावात ''मृत्यूचा वीज खांब?'' दळवीचाळीजवळील गंजलेल्या पोलमुळे दुर्घटनेची भीती!

 

मुरबाड : सरळगाव येथील दळवीचाळीजवळ उभा असलेला महावितरणच्या मुख्य एसटी (हाय टेन्शन) वीज वाहिनीचा लोखंडी खांब पूर्णपणे गंजलेल्या व जीर्ण अवस्थेत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खांब कधीही कोसळून मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित धोकादायक वीज खांबाबाबत अनेक वेळा महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून तक्रारी करण्यात आल्या. मात्र, आजपर्यंत या गंभीर बाबीची कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.परिसरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत पावसाळ्याच्या दिवसांत गंजलेला खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

"अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने हा खांब बदलण्यात यावा," अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच, भविष्यात या खांबामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्यास संपूर्णपणे महावितरण प्रशासन तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.दरम्यान, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून धोकादायक खांब बदलण्याची गरज व्यक्त होत असून, प्रशासन याची कितपत गांभीर्याने दखल घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments