आषाढी वारीत आमदार किसन कथोरे यांचा टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष
गौरव शेलार/मुरबाड: आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात आमदार किसन कथोरे यांनी वारकऱ्यांसोबत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर गांधी टोपी परिधान करून ते दिंडीत चालत सहभागी झाले. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या नामघोषात त्यांनी वारकऱ्यांसोबत विठ्ठलभक्तीचा आनंद लुटला.
वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेची आणि सामाजिक ऐक्याची ओळख मानली जाते. या भक्तिमय सोहळ्यात आमदार कथोरे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांच्या सहभागामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
आषाढी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून समता, सेवा, शिस्त आणि भक्तीचा संदेश देणारी परंपरा आहे. राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी मार्गक्रमण करत असून यंदाची आषाढी एकादशी २५ जुलै रोजी साजरी होणार आहे.या आषाढी वारीत उद्योजक राजेशदादा पाटील यांनी दरवर्षी प्रमाणे पंढरपूर येथे पायी मार्गक्रमण करून संस्कृती परंपरा जोपासली आहे.



No comments