web-banner-lshep2024

Breaking News

18 वर्षांपूर्वीच्या खटल्यात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रमोद हिंदुराव यांना कल्याण न्यायालयाचे समन्स; आज साक्षीसाठी हजर

 

गौरव शेलार / कल्याण : सन 2009 मध्ये कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका फौजदारी खटल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रमोद हिंदुराव यांना साक्षीदार म्हणून कल्याण येथील सह दिवाणी न्यायालयाने समन्स बजावले असून, आज (16 जुलै) न्यायालयात साक्ष होत असून ते न्यायालयात हजर राहणार आहेत.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, या प्रकरणात आनंद प्रकाश परांजपे, एकनाथ संभाजी शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रमाकांत वामन देवळेकर यांची आरोपी म्हणून नोंद आहे. संबंधित गुन्हा 2009 मध्ये दाखल झाला असून, तब्बल 18 वर्षांनंतरही या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.या प्रकरणाचे मूळ फिर्यादी वसंत शंकर डावखरे यांचे दरम्यानच्या काळात निधन झाले आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याचे काम सुरू आहे.

न्यायालयाच्या समन्सनुसार डॉ. प्रमोद हिंदुराव यांच्यासह इतर साक्षीदारांना 16 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता सह दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, कल्याण येथे साक्षीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे, डॉ. प्रमोद हिंदुराव हे या प्रकरणात साक्षीदार म्हणून न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहे. न्यायालयीन नोंदीनुसार आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 171(छ), 500 501 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणातील आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, साक्षीनंतर पुढील न्यायालयीन प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 


No comments