web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड-कल्याण मार्गावर नव्या पाच एसटी बसांचे लोकार्पण संपन्न ; कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण ; नव्या बसमधून केला प्रवास

 

कुणाल शेलार / मुरबाड : मुरबाड-कल्याण मार्गावरील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश मिळाले असून,मुरबाड आगारासाठी मंजूर झालेल्या नव्या पाच एसटी बसांचा लोकार्पण सोहळा शनिवारी मुरबाड बस आगारात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते व जि.प.मा.उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते नारळ फोडुन या नव्या बसांचे लोकार्पण करण्यात आले.राज्य शासनाच्या माध्यमातून मुरबाड आगारासाठी पाच आणि कल्याण आगारासाठी पाच अशा एकूण दहा नव्या बस मंजूर करण्यात आल्या असून,या बस प्रामुख्याने मुरबाड-कल्याण मार्गावर धावणार आहेत.त्यामुळे या मार्गावरील एसटीच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊन प्रवाशांना अधिक सुरक्षित,आरामदायी व वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

लोकार्पणानंतर आमदार किसन कथोरे यांनी स्वतः नव्या एसटी बसमधून प्रवास साधला. यावेळी उपस्थित नागरिकांनी नव्या बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार कथोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक केले.या लोकार्पण सोहळ्यास मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,शिवसेना तालुकाध्यक्ष कांतीलाल कंटे,पंचायत समितीचे माजी सदस्य उल्हास(भाऊ) बांगर,मुरबाड बस आगार व्यवस्थापक मुसळे,भाजप तालुकाध्यक्ष जितेंद्र भावार्थे, भाजप तालुका उपाध्यक्ष एकनाथ पोगेरे,उपनगराध्यक्षा सौ.नम्रता तेलवणे, नगरसेविका उर्मिला सुजित ठाकरे,माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे,माजी नगराध्यक्ष मोहन सासे,नगरसेवक अक्षय रोठे,नगरसेवक नितीन तेलवणे,विनोद नार्वेकर,नंदकुमार जाधव,सागर चंबावणे,माजी नगरसेवक रवींद्र देसले,सागर कार्ले,अमित शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी,कार्यकर्ते,पत्रकार आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांनी यापूर्वी मुरबाड आगाराला मिळालेल्या काही बस इतर जिल्हे व तालुक्यांकडे वळविण्यात आल्याची बाब उपस्थित करत,नव्याने दाखल झालेल्या बसांच्या बाबतीतही अशीच पुनरावृत्ती होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुरबाड बस आगार व्यवस्थापक मुसळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की,"मुरबाड आगारात दाखल झालेल्या या नव्या बसेस केवळ मुरबाड–कल्याण आणि कल्याण–मुरबाड या मार्गावरच धावणार असून त्या इतरत्र वर्ग करण्यात येणार नाहीत."त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे मुरबाड-कल्याण मार्गावरील दैनंदिन प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर प्राप्त बसेसमध्ये नागरिक प्रवाशांना आता सर्व प्रकाराची डिजिटल सेवा मिळणार असून यामध्ये ज्या ठिकाणी प्रवाशांना जायाचे आहे त्या ठिकाणी 2 सेकंदा अगोदरच त्या ठिकाण गावाचे नाव एैकू येणार आहे त्यामुळे गाव मागे राहिला आणि बस पुढे गेली असं आता होणार नाही त्यातच या बसेसमध्ये सिसिटीव्ही  कॅमेरे आतून बाहेरून असल्याने कोणतेही अनौपचारिक कृत्य आता होणार नाही.त्यातच या बसेसमध्ये डिजिटल स्क्रिन बसविण्यात आली असून सध्याचा थांबा,पुढील थांबा व अंतिम ठिकाण असे दिसणार असून रेल्वे प्रमाणे आता प्रवाशांना पुढिल ठिकाण कोणते हे कळणार आहे.रेल्वे येईल तेव्हा येईल परंतु नव्या बसमध्ये रेल्वेचे फिचर आल्याने नागरिकांना प्रवास करणे आता सोयीचे जाणार अशी भावना व्यक्त होत आहे.

 --------------------------------------------------------

माहामार्ग हायवे रोडचा शब्द दिल्यावर बस देण्याचा माझा शब्द होता तो मी पुर्ण केला आहे.प्रवाशांना चांगली सुविधा या बसमधून होईल नविन आलेल्या बसमध्ये त्यामधील पहिला टप्पा आपल्याला दिला असून उर्वरित अजूनही इलेक्ट्रिक बस मिळण्याचा टप्पा आहे त्याच्यामध्ये 50 बसेस आपण घेत असून त्या बसेसचे स्विचींग चार्जिंगचे काम 80 टक्के काम पूर्ण होत आले आहे ते काम पुर्ण झाल्यावर त्या 50 बसेस आपण इलेक्ट्रिकल बसेस आपण आणणार आहोत,आणि त्या सर्व एसी बसेस असतील त्यामुळे ग्रामीण भागातही त्या एसी बस धावणार आहेत व चांगल्या प्रकाराच्या सुविधा आपल्याला मिळतील असा विश्‍वासही यावेळी आमदार किसन कथोरे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.आज मुरबाडला बस सेवा ही सर्वात गरजेची असून कल्याण मुरबाड ही सेवा सर्वात चांगल्याप्रकारे सुरळीत चांगल्या प्रकारे होईल मी मनापासून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,परिवहन मंत्री यांचे अभिनंदन करून आभार मानतो की मी मागणी केली त्या मागणीची दखल घेत तशीच्या तशी पुर्ण केली आणि कल्याण मुरबाड करिता 10 बसेस दिल्या त्यामुळे मुरबाडकरांच्या वतीने त्यांना धन्यवाद.

 -------------------------------------------------------- 

No comments