web-banner-lshep2024

Breaking News

आमदार किसन कथोरे यांचा ‘‘जादुई चष्मा खाली” ; सहकार पॅनलचा दणदणीत विजय...

 

कुणाल शेलार / मुरबाड : दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल असा सामना रंगला होता. मात्र या निवडणुकीत महायुतीची ताकद आणि सहकार पॅनलवरील मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा दिसून आला. सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय मिळवत बहुमत प्राप्त केले असल्याची माहिती असून तर यापूर्वीच ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित केवळ तीन जागांवरील विजयाची आवश्यकता असताना सहकार पॅनलने भरघोस मतांनी यश संपादन केले.

यावेळी आमदार किसन कथोरे यांनी मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की,पत्रकार परिषदेत आपण सुरुवातीपासूनच सहकार पॅनलचा विजय शंभर टक्के होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. "दिल्लीतून गल्लीत आलेले कोणतीही जादू करू शकणार नाहीत. ही सर्वसामान्य जनतेची एकनिष्ठ बँक असून आजपर्यंत या बँकेला कोणतेही गालबोट लागलेले नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार किसन कथोरे यांच्या भूमिकेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर आणि नागरिकांच्या स्टेटसवर झळकत होता. तोच या विश्वासाचा पुरावा ठरल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे.

आमदार कथोरे म्हणाले की,दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक सन २०२६-३१ करिता मतदार बंधू-भगिनींनी सहकार पॅनलवर विश्वास ठेवून संचालक मंडळाच्या उमेदवारांना प्रथम पसंती दिली. त्यामुळेच सहकार पॅनलला भरघोस मतांनी विजय मिळाला. यासाठी त्यांनी सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले आहे.

यावेळी त्यांनी "मोठमोठे गार केले गंमतमध्ये" असा उल्लेख करत,दिल्लीतून गल्लीत आलेल्यांनाही सहकार पॅनलच्या दणदणीत विजयातून ताकद दाखवून दिल्याचे सर्वत्र बोलले जात आहे."अखेर विजय हा अनुभवाचा आणि सत्याचाच असतो," असेही त्यांनी नमूद केले.

        कोणत्याही स्वरूपाची ताकद कायमस्वरूपी चालत नाही.येथे केवळ आमदार किसन कथोरे व पक्षाशी असलेली एकनिष्ठता ताकदेच्या स्वरूपात पुन्हा एकदा दिसून आली आहे. गट-तट निर्माण होत राहतील, मात्र सर्वसामान्यांच्या हितासाठी सहकार पॅनल तेव्हाही सक्षम होती,आजही सक्षम आहे आणि भविष्यातही सक्षमच राहील. बँकेला कोणतेही गालबोट लागणार नाही,असेही त्यांनी सांगितले.

        आमदार किसन कथोरे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसशुभेच्छा दिल्या,त्यांना आव्हान देणारे अनेक विरोधक आले आणि गेले असून त्यांनी अनेकदा आमदार कथोरे यांच्या "जादुई चष्म्याची कला'' पाहिली आहे. तरीही पुन्हा आव्हान दिल्यानंतर अखेर आमदार किसन कथोरे यांचा जादुई चष्मा खाली गेला असल्याने विरोधकांना पुन्हा पराभव पत्करावा लागला,अशीही चर्चा सर्वत्र सूरू आहे.

`

No comments