web-banner-lshep2024

Breaking News

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडून पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांचा सन्मान...

 


गौरव शेलार / नागपूर: नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण करताना डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी आपल्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पोलीस निरीक्षक विनायक नामदेव गोल्हे यांना विशेष प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.दि.२६ जून २०२६ रोजी देण्यात आलेल्या या प्रशस्तीपत्रात डॉ.सिंगल यांनी आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखणे,मोठ्या बंदोबस्ताचे यशस्वी नियोजन,नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेले उपक्रम,वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा,अमली पदार्थविरोधी जनजागृती,तंत्रज्ञानाधारित पोलीसिंग आणि विविध सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

        प्रशस्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे,ऑपरेशन थंडर,मिशन मुक्ती,ऑपरेशन शक्ती,ऑपरेशन शोध यांसारख्या महत्त्वाच्या मोहिमांमध्ये तसेच नागरिकाभिमुख उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीत गोल्हे यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांच्या समर्पित सेवेमुळे नागपूर शहर पोलीस दलाची उद्दिष्टे प्रभावीपणे पूर्ण करण्यात मदत झाल्याचेही डॉ.सिंगल यांनी म्हटले आहे.नव्या जबाबदारीकडे जात असताना डॉ.सिंगल यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याची आठवण जपत पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांना पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य,यश आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.ही प्रशंसा केवळ एका अधिकाऱ्याचा सन्मान नसून, कर्तव्यनिष्ठ,प्रामाणिक आणि जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस दलाच्या समर्पित कार्याची दखल असल्याची भावना पोलीस वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

No comments