चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; एका विद्दयार्थ्याचा मृत्यु तर 13 विद्यार्थी जखमी
कुणाल शेलार / मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात आज सकाळी मोठा अपघात घडला असून चेंबूर येथील 11 नंबर रोडवरून विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्या शाळेच्या बसवर अचानक मोठे झाड कोसळल्याने एकच खळबळ उडाली.या दुर्घटनेत एका विद्दयार्थ्याचा मृत्यु झाले असल्याचे कळून येत असून सुमारे 12 ते 13 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी विद्यार्थ्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सदर घटनेची माहिती कळताच मुंबईचे महापौर रितु तावडे व उपमहापौर संजय घाडी घटनास्थळी दाखल झाले यावेळी महापौर रितु तावडे यांनी घटनास्थळी पाहणी केली असून पालिका प्रशासनाकडून तात्काळ घडलेल्या घटनेसंदर्भात आढावा घेणार असून येथील नागरिकांनी सदर झाड डेंजर झोन मध्ये असून काढावे असे पत्र दिले होते जर ते पत्र माझ्या हाती लागले तर निश्चितच अधिकार्यांवर मी कारवाई करणारअसल्याचेही यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगितले आहे.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मुसळधार पाऊस आणि जोरदार वार्यामुळे झाड कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
मुरबाड शहरात देखील लहान मोठे वाहने शाळेच्या विद्दयार्थ्यांना ने आणण्यासाठी येत असल्याने काही ठिकाणीही मोठ मोठी झाडे शहाराच्या आतमध्ये असल्याने त्यांच्या फांद्दयाही लोमकळतांना दिसत आहेत त्यामुळे अशी घटना मुरबाडमध्ये घडू नये म्हणून मुरबाड प्रशासकांनीही यासंदर्भात तात्काळ सर्व शहाराची पाहणी करून जीर्ण व वाढलेल्या झाडांच्या फांदयां तोडून अशी कोणतीही घटना घडू नये म्हणून दखल घ्यावी अशी मागणी पालक वर्गांकडून होत आहे.


No comments