मुरबाडमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! मटका जुगार-गुटखा तेजीत प्रशासन मान्न गाढ झोपेत ?
ठाणे : मुरबाड शहरात सध्या कायद्यापेक्षा अवैध धंद्यांचीच सत्ता मोठी झाली आहे का? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत. कारण गावागावांत मटका, जुगार आणि गुटख्याचे जाळे इतक्या बिनधास्तपणे पसरले आहे की, जणू कुणाच्याच धाकात हे धंदे हे धंदे राहिलेले नाहीत.दिवसा सामान्य वाटणाऱ्या गल्लल्या रात्री पडताच नंबरच्या व्यवहारांनी जाग्या होतात.
ओपन काय? क्लोज किती? या कुजबुजीत हजारो रुपयांची उलाढाल सुरू असते. गरीब मजूर, हातावर पोट असलेलेकष्टकरी आणि दिशाहीन तरुण या जुगाराच्या राच्या दलदलीत रोज ओढले जात आहेत. काहींनी घरातील दागिने गमावले तर काहींचे संसार अक्षरशः रस्त्यावर आले.
दरम्यान, गुटख्याच्या विक्रीनेही भीषण रूप धारण केले आहे. कायद्याने बंदी असलेला विषारी माल खुलेआम विकला जात असून शाळकरी ळकरी मुलांपासून तरुणांपर्यंत अनेकजण व्यसनाच्या आहारी जात आहेत. याकॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची भावना नागरिकांत आहे. विशेष म्हणजे, अधूनमधून होणाऱ्या कारवाया या केवळ कागदोपत्री आणि फोटोपुरत्याच मर्यादित असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
कारण धाड पडल्याच्या बातम्या येतात पण दुसऱ्याच दिवशी तेच अड्डे पुन्हा सुरू झाल्याचे वास्तव नागरिक अनुभवत आहेत. मुरबाडमध्ये आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की,कायद्याची भीती संपली आणि अवैध धंदेच बेधडक झाले.
तरुणाई व्यसनात बुडत असताना कुटुंबे उद्ध्वस्त होत असताना आणि समाजाची घडी विस्कटत असताना प्रशासनाची शांतता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. नेमकं कोणाच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू आहेत? सामान्य जनतेच्या मनात आता हा प्रश्न धगधगू लागला आहे. जर वेळीच कठोर कारवाई झाली नाही, तर उद्या मुरबाडची ओळख विकासाने नव्हे तर मटका, जुगार आणि गुटख्याच्या अड्यांनी होईल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत



No comments