उल्हासनगरात ‘नवी कमान’ प्रशांत धांडे यांच्या हाती शहर प्रमुखपदाची धुरा, राजकारणात नवे समीकरणे!
मिलिंद दळवी / उल्हासनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने उल्हासनगरातील राजकीय पटावर मोठी चाल खेळत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे. कॅम्प क्रमांक ४ ते ५ या महत्त्वाच्या भागासाठी प्रशांत धांडे यांची शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.
ही नियुक्ती केवळ औपचारिक पदभरती नसून पक्ष संघटन अधिक भक्कम करण्याचा रणनीतिक डाव मानला जात आहे. पक्ष नेतृत्वाने दिलेल्या स्पष्ट सूचनांनुसार, तळागाळात पोहोचणारे, कार्यकर्त्यांना एकत्र बांधणारे आणि जनतेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व पुढे आणण्यावर भर देण्यात आला आहे.आणि त्यातच प्रशांत धांडे यांची निवड झाली आहे.
प्रशांत धांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी स्थानिक पातळीवर जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांची ओळख ‘ग्राउंडवर काम करणारा नेता’ अशी असून, कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मजबूत प्रभाव आहे. विशेष म्हणजे, सामान्य नागरिकांशी थेट संपर्क ठेवण्याची त्यांची शैली हीच त्यांची खरी ताकद मानली जाते.
या नियुक्तीमुळे कॅम्प ४ ते ५ परिसरात शिवसेना (उद्धव गट) नव्या जोमाने उभी राहील, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, या भागातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधी पक्षांसाठी ही नियुक्ती एक मोठे आव्हान ठरू शकते.
स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “आता संघटना अधिक आक्रमक होईल” अशी चर्चा सुरू आहे. आगामी काळात प्रशांत धांडे यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन, संपर्क अभियान आणि संघटन विस्ताराला अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उल्हासनगरच्या राजकारणात ‘नवी कमान’ उभारली गेली आहे.आता या कमानीखाली किती मोठा जनसमर्थनाचा दरवाजा उघडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



No comments