web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मध्ये गुटखा-मटका धंदा तेजीत; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, गृहमंत्र्यांचे अपयश ?

ठाणे : राज्यात गुटखा आणि मटका या बेकायदेशीर धंद्यांना पुन्हा जोर आला असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. विविध शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही हे जाळे वाढत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या कारवायांनंतरही हे धंदे थांबत नसल्याने प्रशासनाची कार्यक्षमता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मुरबाड तालुक्यासह शहरात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही खुलेआम विक्री सुरू आहे. दुसरीकडे, मटका अड्ड्यांवर रात्री उशिरापर्यंत व्यवहार चालत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. या अवैध व्यवसायांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे, तर आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय, या धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर, राज्याच्या गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधकांनी सरकारवर टीका करत कायद्याचा धाक उरलेला नाही असा आरोप केला आहे. तर सरकारकडून मात्र लवकरच कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.

    दरम्यान, नागरिकांनीही सतर्क राहन अशा अवैध प्रकारांविरोधात पुढे येण्याची गरज आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, त परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती भीती व्यक्त केली जात आहे. तसेच सदरील गुटख्यांच्या पुड्या हे गृहमंत्र्यांना पोस्टाने निवेदनासोबत पाठवली जाणार असल्याचे तक्रारदाराने म्हटला आहे.

 

No comments