रखरखत्या उन्हात लहान बालकाचे पोलीस कर्मचाऱ्यांना स्मितहास्य;काम करण्याची दिली ऊर्जा...!
गौरव शेलार / मुरबाड : राज्यामध्ये सध्या उष्णतेची लाट आल्याने उकार हा मोठ्या प्रमाणावर वाढला असून तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे वाढत्या उन्हामुळे उष्णताचा धोका वाढला असून उष्मघातामुळे अनेकांना त्रास होत आहे. रखरखत्या उन्हात महाराष्ट्र पोलीस काम करत आहेत त्यांच्या कार्याची दखल एका गाडीवरून जाणाऱ्या लहान बालकांनी घेतली आहे त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुरबाड पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी सोनवणे हे ग्रस्तीवर असताना एका एक्टिवा मोटरसायकल वरून जात असलेल्या जोडप्या समावेत रखरखत्या उन्हात आईच्या कुशीत धोकादायक स्थितीत बसलेला बालक प्रतिकूल परिस्थितीत किती आनंद राहावा अशा परिस्थिती त्याचा सकारात्मक भाव आणि त्या बालकाने दिलेला रिस्पॉन्स त्याचा आत्मविश्वास यातून निर्भीडपणे काम करण्याची ऊर्जा देते असाच व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. याच वायरल व्हिडिओची माहिती घेतली असता हा व्हिडिओ मुरबाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी सोनवणे यांनी आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर केल्याचे समजले.
सध्या उष्णतेच्या पाऱ्यात रखरखत्या उन्हात महाराष्ट्र पोलीस आपला कर्तव्य बजावत असताना दिसत आहेत. त्यांच्या या कार्याला या बालकाने स्मित हास्य देऊन पोलीस अधिकारी सोनवणे व त्यांच्या सहकार्यांना काम करण्याची ऊर्जा निर्माण करून दिली आहे. तसेच वाढत्या उन्हाचा तडाका लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक लहान मुले,आजारी व्यक्तींनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक असून बाहेर जाणे अनिवार्य असल्यास सुती कपडे, टोपी, छत्री आणि चष्मा याचा वापर करावा उन्हातून आल्यावर चक्कर येणे मळमळणे किंवा तीव्र डोके दुखणे जाणवल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावा उष्मघातापासून बचावाच्या सूचनाचे पालन करून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करावा असे यावेळी पोलीस अधिकारी सोनवणे यांनी आमच्याशी बोलताना तमाम वाहन चालक नागरिक यांना अहवान केले.

%20WhatsApp%20Business.png)

No comments