web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटवलं;मुरबाड शहर सुविधालोभी करण्यासाठी मुख्याधिकारी मनोज म्हसे यांचा पुढाकार

नामदेव शेलार / मुरबाड : नगर विकास खात्या मार्फत नियुक्ती केलेल्या फुटपाथ समितीची मिटिंग मुखाधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली कर्यालयात पार पडली.यावेळी शहरातील विविध विषया वर चर्चा करण्यात आली. या मिटिंग मध्ये फुटपाथ वरील अतिक्रमण हटवण्यासाठी दुकानदारांना आहवन करण्यात आले होते त्या नुसार सर्व दुकानदारांनी आपल्या दुकाना समोरील फुटपाथ मोकळे करून सहकार्य केले. मुरबाडला सर्व सुविधा लोभी करण्यासाठी मुख्यधिकारी यांनी पुढाकार घेतल्याने नागरिकांनी त्याना धन्यवाद दिले आहेत.

   दुकान नोंदणी,वाहन पार्किंग,बाजार पेठ रस्त्यावर असणाऱ्या अतिक्रमण सुलभ सोच्यालयअशा विविध विषय मार्गी लावण्यात येणार आहेत.फुटपाथ कमेटी मिटिंग मध्ये मुरबाड शहर विकासासाठी फुटपाथ शासकीय समिती सदस्य नामदेव शेलार फुटपाथ दुकानदाराचे प्रतिनिधी लेबरफन्ड युनिट चे मुरबाड अध्यक्ष रवींद्र चेंदणे यांनी या सुविधा कडे लक्ष वेदळे होते.मुरबाड नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी पायाभूत सुविधा पाणीपुरवठा वीज रस्ते गटारी पूर परिस्थितीसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला आहे.

  त्याना अपेक्षित असणारे मुरबाडची जडणं घडणं या कमेटी वर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यातून होत आहे.यामध्ये मुरबाड नगरपंचायतचे मुखाधिकारी मनोज म्हसे बाधकाम इंजिनियर पवार,अमोल महागाडे फुटपाथ कर आकरणी अधिकारी यांचे मोठे योगदान आहे.आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड शहरांमधील 17 प्रभागात मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला आहे.पाणी योजनेसाठी शासनाचा निधी देऊन शहरातील विहिरी बोरवेल मधून रात्रंदिवस नागरिक पाणी भरत होते ते बंद झाले आहे.मुरबाड शहरात एकूण 17 प्रभाग आहेत तेथील गटारे रस्ते रोड लाईट पाणीपुरवठा कामे करण्यात आली आहेत त्या मध्ये अधिक कामे हाती घेतल्याचे सांगण्यात आले.

  पावसाळ्यात म्हसा रोड चौक नागाचा खडक येथे पाणी साचून रस्ता बंद होत असे तेथे मोठे गटारी साकव तयार झाल्याने पावसाळ्यात मुरबाड करांच्या अडचणी संपुष्टात येणार आहेत पार्किंगसाठी खुले नाट्यगृह कृषी उत्पन्न बाजार समिती मातानगर मधील श्री बंडोपंत क्षीरसागर पटांगणात वाहन पार्किंगची सोय केली आहे.येथील अतिक्रमण हटवण्यात आले आहे.त्या मध्ये अजून सुधारणा करण्यात येणार आहेत,मुरबाड शहरांमधील फुटपात वरील अतिक्रमणे हटवल्यावर आता रस्त्यावर वाहने लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.मुरबाड शहरांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या फुटपाथ वरील काढण्यात येणार आहेत शहरा मधील पावसाळ्यात रस्त्यावर पडणारी झाडें तोडण्यासाठी सुरुवात केली आहे नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येणार आहेत.

मुरबाड शहरांमधील पावसाळ्यात झाडांच्या फांद्या विद्युत वाहिनीवर पडून वीज पुरवठा खंडित होतो त्याकडे नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज म्हसे यांनी अधिक लक्ष वेधले आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि पावसाळ्यात त्रासदायक ठरणारी विद्युत वाहिनी यामधील दोष अडचणी सोडवण्यासाठी प्रामुख्याने आमदार किसन कथोरे यांनी प्रशासनाला उपाययोजना राबवण्याचे सूचना दिले आहेत/

 विकास कामांना शासनाचा निधी कमी पडू देणार नाही परंतु निकृष्ट बोगस कामाचा समर्थन करणार नाही दोशींवर प्रशासनाने योग्य कारवाई करण्यासाठी लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याची भूमिका आमदार किसन कथोरे यांनी घेऊन शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी योगदान दिले आहे.

एका बाजूला मुरबाड शहरात नगरपंचायत मार्फत जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहेतर दुसऱ्या बाजूला अतिक्रमण हटवा मोहीम हाती घेतली आहे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून माहिती द्यावी असे अहवाल मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केले आहे.

No comments