web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मतदारसंघासाठी विकासाचा ‘ब्लूप्रिंट’; निधी कमी पडू देणार नाही – मंत्री जयकुमार गोरे

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेत सविस्तर चर्चा केली. या बैठकीत ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते विकास आणि विविध योजनांबाबत महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या.

यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, गट “ब” अंतर्गत अनुशीर्ष २५-१५ मधील विकासकामे, विविध प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची दर्जोन्नती, नॉन प्लॅन रस्त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक देण्याचा प्रस्ताव यावर चर्चा झाली. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पर्यटन क्षेत्र विकास योजनेअंतर्गत पर्यटनवाढीस चालना देणाऱ्या प्रकल्पांवरही भर देण्यात आला.

ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात, तसेच रखडलेली कामे मार्गी लागावीत, यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार कथोरे यांनी केली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी “मुरबाड मतदारसंघाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,” असे ठाम आश्वासन दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे मतदारसंघातील विकासकामांना नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.या बैठकीस ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील उपस्थित होते. एकूणच, या बैठकीमुळे मुरबाडच्या ग्रामीण विकासाला नवी गती मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

 

No comments