महाराष्ट्र राज्य नगरविकास विभागामार्फत ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांची मुरबाड नगरपंचायत पथविक्रेता समितीवर निवड!
गौरव शेलार / मुरबाड : महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमन्वय तयार केलेले महाराष्ट्र शासन राजपत्राने नगरविकास विभाग अधिसूचनाने पतविक्रेता उपजीविका संरक्षण व पथ विक्री अधिनियमन्वयद्वारे मुरबाड नगरपंचायत पथविक्रेता समितीवर जेष्ठपत्रकार नामदेव शेलार यांची नियुक्ती केली आहे.
शासन मान्यतेने प्राधिकृत केल्यानंतर त्या अनुषंगाने प्राप्त अधिकार अन्वये महाराष्ट्र सरकारने याद्वारे मुरबाड नगरपंचायत जिल्हा ठाणे करिता पतविक्रेता समिती शासनाने स्थापन केली आहे.महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार (अ) मधील अशासकीय संघटना प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे.
मुरबाड शहरांमधील फुटपात, रस्ते, शौचालय, पिण्याचे पाणी, विद्युत ,स्वच्छता ,वाहन पार्किंग,पथविक्रेता मार्केट अशा विविध कामांच्या सूचना नवनियुक्त सदस्य नामदेव शेलार यांनी मुरबाड नगरपंचायत मार्फत शासनाला पाठविण्यात येणाऱ्या अहवालात नोंदवण्यासाठी लेखी पत्रात दिल्या आहेत.
स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी शहराच्या सार्वजनिक विकासासाठी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.परंतु सामान्य नागरिक पतविक्रेते दुकानदार अत्यावश्यक सेवेची मागणी करत होते.त्याकडे जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी लक्ष घालून मुरबाड शहरवासी यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुरबाड मधील प्रमुख रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करावी शहरात रस्त्यावर प्रमुख बाजारपेठेत व्यापारी मिरचीच्या पोते ठेवतात मिरची रस्त्यावर पसरवून ठेवतात त्यामुळे वयोवृद्ध ,शालेय विद्यार्थी, नागरिकांना मिरचीचा त्रास होतो.आरोग्याला धोकादायक आहे. मुरबाड कृषी उत्पन्न बाजारपेठेत खाऊ गल्ली ,आठवडा बाजार, भाजीपाला ,फळ मार्केट आणि वाहनतळ उभारण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांनी उपाययोजना करण्याची तयारी केली आहे.



No comments