web-banner-lshep2024

Breaking News

Pune News: एकवीरा देवीच्या यात्रेत तुफान राडा;यात्रेला गालबोट!

 

पुणे / प्रतिनिधी : Ekvira Devi Temple Viral Video : कार्ला येथील आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेला गालबोट लागलं आहे. कार्ला गड उतरताना झालेल्या वादातून दोन गटांत तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीमुळे  काही भाविक जखमी झाले आहेत.कल्याण आणि पनवेल येथील भाविकांच्या दोन गटात हमरीतुमरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.दोन गटातील भाविकांमध्ये झालेल्या वादविवादाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

नेमकं काय घडलं?

एकविरा देवीची मुख्य यात्रा संपन्न झाल्यानंतर भाविक गड उतरत असताना हा प्रकार घडला. काल बुधवारी झालेल्या किरकोळ वादानंतर आज दुपारी पुन्हा एकदा वातावरण तापलं.किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. या अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने भविकांमध्ये पळापळही झाली. घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं निदर्शनास आल्यावर पुणे ग्रामीण पोलीस दलातून अतिरिक्त जवानांची कुमक मागवण्यात आली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राडा करणाऱ्या आणि दगडफेक करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दगडफेकीत जखमी झालेल्या भाविकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान परिसरात अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे.दरम्यान सध्या कार्ला गड परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.मात्र,या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

No comments