web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मध्ये पेट्रोल साठी वाहनधारकांच्या रांगा ; व्यवसाय गॅस सिलेंडर गायब...!

नामदेव शेलार / मुरबाड : लोकप्रतिनिधी मंत्री आणि प्रशासन म्हणतात गॅस पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही या अफवा आहेत मग पेट्रोल पंप गॅस एजन्सी बाहेर लोकांच्या पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर साठी रांगा कशासाठी लागले आहेत असा सवाल नागरिक करत आहेत. मुरबाड मध्ये पेट्रोल पंप बंद पडल्याने जुन्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या त्यामुळे मुरबाड कल्याण कडे जाणारा रस्ता ठप्प झाला होता लोकात अफवा पसरली पेट्रोल डिझेल संपला हे वाहन चालकांच्या कानावर येतात कोणी वाहने घेऊन तर कोणी कॅन बाटल्या घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचले मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी बाटल्या कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देण्यास नकार दिला वाहनांमध्ये पेट्रोल दिला.

     मुरबाड मध्ये घरगुती गॅस नोंदणी केल्यावर काही दिवसांनी दिला जात असून व्यावसायिक गॅस सिलेंडर एजन्सीकडे उपलब्ध नाही त्याचा फटका छोट्या मोठ्या दुकानदारांना बसला अनेकांनी दुकाने बंद करून घर गाठला आहे बाहेरील कारागीर काम सोडून माय देशी परतत आहेत. गॅस पुरवठ्याने सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन दिवस टीका मिका फोटो सेशन करून तपासणी केली मात्र अनेक व्यावसायिकांकडे घरगुती गॅस सिलेंडर असून चोरून लपून त्याचा उपयोग व्यवसाय साठी केला जात आहे.

   गेले पंधरा दिवसापासून मुरबाड मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा एजन्सी धारकाला पुरवठा होत नाही स्थानिक लोकप्रतिनिधी पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल डिझेल साठा तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघात असणारे नायरा एचपी पेट्रोल पंप मुरबाड बदलापूर मधील बंद होते तसेच जुन्नर आळेफाटा रस्त्यावरील पेट्रोल पंप बंद झाल्याने वाहन चालकात घबराट झाली आहे.

No comments