web-banner-lshep2024

Breaking News

माळशेज घाटात गोमासाने भरलेली पिकप पलटी;वाहतुक पोलिसाचे कानावर हात तर राष्ट्रीयमहामार्ग पोलिस वाटमारीत व्यास्त...!

 

नामदेव शेलार / मुरबाड :  माळशेज घाटात  भरधाव वेगाने कल्याण कडे जाणारी कलिंगडाच्या आड   गोमांसाची अवैध वाहतूक करणारी एक पिकअप गाडी पलटी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

   स्थानिकांच्या माहितीनुसार, गाडी क्र.एम.एच.०४ एके.५४५४ पिकअप गाडी वेगात घाटातून कल्याण कडे जात  असताना चालकाचा ताबा सुटला असल्याचे बोलले जात आहे.जुन्नरहुन  कल्याणच्या दिशेने ही गाडी येत होती.बोगदयाच्या वर असणा-या वळणावर सदरची गाडी पलटी झाली. गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस साठवलेले होते, जे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप केला जात आहे. अपघातानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, कोणी तरी सावर्णे आरोग्य विभागाच्य २०८ हेल्प लाईनला फोन केला असता मदती साठी गाडी गेली मात्र अवेध गोमास पिकअपचा चालक फरार झाला होता.टोकावडे पोलिसाकडून नेहमी प्रमाणे पंचनामे करण्यात येत असल्याचे समजले

     या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, घाट मार्गावरून सुरू असलेली अवैध वाहतूक थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. विशेषतः वाहतूक पोलिसांची भूमिका केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिली असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.यामागे हप्तेबाजीचा मोठा खेळ सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. काही अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच अशा प्रकारची बेकायदेशीर वाहतूक मागील अनेक  वर्षा पासून  सर्रासपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. जर वेळेत कडक कारवाई झाली असती, तर अशी घटना घडली नसती, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

        तसेच घाट परिसरातील अवैध वाहतुकीवर तात्काळ अंकुश आणावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन आता तरी जागे होणार का, की अशाच घटना पुन्हा घडत राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माळशेज हायवे हा रस्ता तसाही  अवैध वाहतुकीचा खुश्कीचा मार्ग आहे हे वारंवार धलेल्या घटना वरून जगजाहिर आहे, या रस्त्यावरून रेतीची(वाळू) मातीची तस्कारी रोजच होते ,या  रस्त्यावरून रोजच पहाटे पहाटे गोमासाची तस्करी होत असल्याचे खात्री लायक वृत्त असून ,  बकरीईद संपताच  या घाटातुन मुंबई सारख्या शहरी भागात कत्तली साठी गुरांची तस्करी होणारच यांत शंकाच नसताना, आज अचानक हि पिकअप पलटी झाली आणी पुन्हा एकदा हा प्रकार चव्हाट्यावर आला. 

    कल्याण पासून माळशेजघाटातील तमाम पोलिस चौक्या,  महामार्ग हायवे वाटमारी पथक मात्र अनभिज्ञ राहिले की ? विशष म्हणजे या रस्त्या वरील मामनोली, पोटगांव जंगलात मुरबाड लगत ते घाटात जागो जागी झेंडूच्या फुलाच्या ट्रकच्या ट्रक भर झेंडूची फूल फेकून दिलेली रोजच्या रोज नागरिक पाहतात, बाजारात झेंड्युच्या फुलांना  १००रू किलो भाव असून मागणी देखील असतांना ट्रकभर फुल फेकून देण्यामागच कोड नागरिकांना कायम पडलं असलं तरी ह्या फुला आडून गांजाची व गोमाची तस्करी होत  असल्याचे काही जाणकारांच मत असून या घटनेला दुजोर येथील बदली होऊन गेलेले पोलिस कर्मचारी देत असल्याचे समजते.

        माञ या घाटात  वाळूचोरी रेतीच्या ट्रक गांजा,गोमास अशा तस्करीसाठी एक खुश्कीचा मार्ग बनला आहे,या मार्गावर जागोजागी महसुल कार्यालये पोलिस तपासनी पथक ते राष्ट्रीय महामार्ग हायवे पोलिसांच्या पोटगांव जंगलात,उमरोली गावाजवळ, सावर्णे, घाटात जागोजागी वाटमारी पथकाच्या गाड्या उभ्या असता आज पावेतो एकही अवैधरीत्याची घटना पकडल्याची चर्चा होत नाही.

 

No comments