web-banner-lshep2024

Breaking News

सफाई कामगाराची चाकूनं भोकसून हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या

उल्हासनगर : महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराची ऑन ड्युटी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पतीच्या मृत्यूची बातमी कळताच सफाई कामगाराच्या पत्नीनंही आत्महत्या केल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. मृत सफाई कामगाराचं नाव महादू जगताप (वय 35) असं आहे. तो उल्हासनगर महानगरपालिकेनं सफाईचा ठेका दिलेल्या कोणार्क इन्व्हायरो कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. कचरा फेकल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 संबंधित घटना आज सोमवारी (9 मार्च) दुपारी उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3, सेक्शन 20 परिसरातील आनंद आईस्क्रीम जवळ घडली. महादू जगताप हा नियमित सफाईचं काम करत असताना दुर्गेश गुप्ता नामक व्यक्तीनं त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारानं अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या शरीरावर 32 ठिकाणी वार झाले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोराची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी आरोपी दुर्गेश गुप्ता याला अटक केली आहे. या दुहेरी घटनेमुळे उल्हासनगर परिसरात संताप व्यक्त होत असून, सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कॅम्प क्रमांक 3, बराक क्रमांक 896 इथं माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोर सफाई कामगार महादू जगताप याच्यावर हल्ला झाला. हल्लेखोर दुर्गेश गुप्ता (वय 31) यानं महादू याच्यावर चाकूनं 32 वार केले, ज्यामुळे महादूचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वीही दुर्गेश गुप्ता आणि महादू जगताप यांच्यात भांडणं झाल्याची माहितीही समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. फॉरेन्सिक पथकानं पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी दुर्गेश गुप्ता याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पतीच्या हत्येची वार्ता ऐकताच महादू जगताप याच्या पत्नीनं पूर्वी महादू जगताप (वय 32) हिनं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, महादूची दोन लग्न झाली होती. त्याच्या पहिल्या पत्नीचा यापूर्वीच मृत्यू झाला असून तिला दोन मुलं आहेत.

No comments