पुन्हा ग्रामीण भागात पेटल्या चुली; मुरबाडच्या खाजगी गॅस सिलेंडरचा दुकानात वापर....
नामदेव शेलार / मुरबाड : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भारताच्या ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका बसला असून गॅस टंचाईमुळे महिलांची पावलं जगंलात वळली आहेत. गॅस सिलेंडर महागाई टंचाईचा सामना करण्यासाठी आता शहरी आणि ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक सुरु झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे भारतामध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस टंचाईची भीती निर्माण झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.देशांमध्ये गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अनेक साठेबाजीसह काळाबाजार रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये एस्मा कायदा लागू करण्यात आलेला आहे.
मात्र ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात कार्यरत असलेल्या गॅस सर्विस एजन्सी मधून ग्रहकांच्या नावाने रिक्षा,टेंम्पो वाले हे मोठ्या प्रमाणात गॅस वाहतूक वडापाव, चायनीज, हॉटेल ,धाबा ,अड्डाभुर्जी असे अनेक व्यवसायकांना दुपट्टभावाने विक्री होत असून मुरबाड मध्ये गॅस घेण्यासाठी लाईन लागली आहे.दुकानदारांनी तुटवडाचा फायदा घेऊन दरवाढ करून मुरबाड मध्ये मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री सुरु आहे. काही दलाल गॅसची विक्री सर्रास करत आहेत. सदरील काळा बाजार विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात येऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.शासकीय योजना अंतर्गत शेकडो लोकांना गॅस सिलेंडर देण्यात आले आहेत.
मुरबाड अंजनी गॅस एजन्शीकडे गॅस तुटवडा नसून काळ्या बाजारात गॅस विक्री होत नाही. मात्र काही लोकांच्या नांवे घरगुती गॅस रिक्षा टेम्पोने दलाल विक्री करतात त्यांच्याशी आमचा सबधं नसल्याचे सांगण्यात आले. मुरबाड मध्ये सोनारपाडा आणि एमआयडीसी येथे एका कंपनी मध्ये गॅस विक्री होत आहे.त्याची चौकशी शासनाने करून व्यवसाय गॅस कोण पुरवतो त्याच्यावर एस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मांगणी होत असून त्याकडे आता राज्य सरकार कोणत्या पद्धतीची कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे.घरोघरी मातीच्या चुली पेटू लागल्या आहेत. ग्रामीण भागात सर्वत्र चुलीवर स्वयंपाक सूरू झाला आहे.
-----------------------------------------------------------------------------
ग्रामीण भागात उन्हाळा ,पावसाळा, हिवाळ्यात चुलीवरच स्वयंपाक केला जातो.त्यामुळे ग्रामीण भागातून शहरामध्ये राहणार्या महिलांना काही कठीण नाही. फक्त लाकडं विकत घ्यावे लागतात.
मेघा थोरात , मुरबाड
आम्ही पूर्वी पासून चुलीवर स्वयंपाक करतो.आम्हाला काही फरक पडत नाही.गॅस सिलेंडर मिळत नसल्याने शहरी भागात खूप चुल पेटवून स्वयंपाक करणे जिक्रिचे झालं आहे.बिल्डिंग मध्ये धूर नको दुसरीकडे गॅस सिलेंडर मिळत नाही ऑनलाईन गॅस पुरवठा बिलं वारेमाफ येत असल्यामुळे दोन्ही अडचणीत महिलांना सामोरे जावं लागत आहे.
पुष्पा पांडुरंग मोरे, सांगनोरे- ओतूर



No comments