web-banner-lshep2024

Breaking News

एका बाजूला गँसचे दर गगनाला भिडले असता मुरबाड मध्ये अंजनी गॅस एजन्सी कडून ग्राहकांची लूट...!

नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यात अंजनी गॅस एजन्सीकडुन महिला ग्राहकांची फसवणूक करून आर्थिक लुट कायम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. २६ जानेवारी २०२6 रोजी महाराष्ट्रात १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर ८०२.५० रुपयांना मिळत होता. पंरतु गॅस सिलेंडरच्या किंमतीत वेळोवेळी बदल होतात.याचाच गैर फायदा अंजनी गॅस एजन्सीकडुन घेतला जात आहे.

मुरबाड तालुक्यातील हजारो ग्रहकांची अंजनी गॅस एजन्सी घरपोच गॅस सिलेंडर करत असताना, सामान्य ग्राहकांकडून ८६० रुपये घेत असल्याचे दिसून आले. अंजनी गॅस एजन्सी ५७.५० रुपये अगाऊ घेऊन ग्रामीण भागातील ग्राहकांची सिलेंडर घरपोच करण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचे उघड झाले. तर वजनात देखील वर्षानु वर्ष गफलत करीत आले असल्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे समजले जाते. LPG सिलेंडर रिकामे असताना त्याचे वजन १४.८ किलो असते. जेव्हा ते भरलेले असते, तेव्हा त्याचे वजन २९ किलो असते, परंतु हे सिलेंडर घरपोच करताना कोणत्याही प्रकारचे वजन न करता सामान्य ग्राहकांना वितरीत केले जातात. गॅस तुटवडा झाल्याने घरगुती गॅस सिलेंडर वडापाव, चयनीज, हॉटेल, कोंबडीवाले अन्य दुकानात जादा पैसे घेऊन गॅस तुटवडा निर्माण केला जात आहे.

मुरबाडला शासकीय अनुदान गॅस ग्रहकांना मिळत नाही गॅस सिलेंडर काळ्या बाजारात विकला जात आहे अशी हजारो गॅस सिलेंडर कुटून आली यांची चॉकशी तसीलदार आणि गॅस कंपनी करत नाही. सद्या युद्धात गॅस काळा बाजार वाढला असून व्यवसायिक राजकीय पाठींबाने सामान्य लोकांना धुडकाऊन लावत आहेत प्रत्येक सण मध्ये गॅस काळा बाजार तेजीत चालतो तसाच युद्धात गॅस तुटवडा करून महागाई वाढवली आहे.

  सिलेंडर बुकिंग केल्यानंतर तो घरपोच करण्याची जबाबदारी गॅस एजन्सीची असते,शहरी भागात ५ किलोमीटर तर ग्रामीण भागात १५ किलोमीटर पर्यंत फ्री होम डिलिव्हरी करण्याचा नियम असताना, सिलेंडर बुकिंग केले जाते तेव्हाच होम डिलिव्हरीचे चार्ज म्हणून १९.५० रुपये जोडून ८०२.५० रुपये गॅस सिलेंडरचे जमा झालेले असतात परंतु अंजनी गॅस हे सर्व नियम धाब्यावर बसवून ग्राहकांकडून ५७.५० रुपये आगाऊ रक्कम वसूल करून सामान्य ग्राहकांची लूट करत आहे. तर जागेवर जाऊन सिलेंडर घेतला असता, डिलिव्हरी चार्ज १९.५० रुपये परत न देता येथे ही ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत अनेक तक्रारी करूनही गॅस कंपनी अथवा संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही नागरिकांतून बोलले जात आहे. सदर एजन्सीकडुन होत असलेल्या फसवणूकीची चौकशी करण्याची मागणी लोकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.तहसीलदार, पुरवठा विभाग काय कारवाई करणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.मात्र मुरबाडला सर्वच गॅस एजन्शी धारकांनी गॅस काळा बाजार सुरु करून गॅस पुरवठा होत नसल्याच्या नावाने सामान्यांच्या चुली बंद पाडून लोकांना पुन्हा लाकडं पेटून चुली मांडायला भाग पाडले आहेत.

No comments