web-banner-lshep2024

Breaking News

कोट्यवधीच्या दागीन्याना गंडा घालणारे रॅकेट गल्लीपासुन दिल्ली पर्यंत;तपास ATS कडे वर्ग करण्याची मागणी..!


मुरबाड :  शहरातील तोंडलीकरनगर येथे एका उच्च भ्रू सोसायटीत राहणाऱ्या सर्वसामान्य असणारीजयश्री ऊर्फ राणी जनार्दन देशमुख नावाच्या महिलेने शहरातील शेकडो महिलांचे  कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवत तिला जेरबंद करुन तीला नऊ  एप्रिल पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असुन अनेक घरंदाज महिला या चक्रव्यूहात अडकल्या असुन  त्यांची चौकशी  पोलिस ठाण्यात, केली जात आहे,  आपली यातुन सुटका होईल की नाही या भितीने महिला तणावात आहेत.

         याबाबत सविस्तर वृत्त असे की मुरबाड शहरात अनेक महिलांचे महिन्याला पैसे जमा करून भिशी लावण्याचा प्रकार आहे. त्यातुन आपल्या कुटुंबाची आर्थिक बचत करण्याचा उद्देश असतो.  ही भिशी कोणीतरी एक प्रमुख महिला चालवित असते या महिलेकडे इतर सर्व सदस्य महिला दर महिन्याला पैसे जमा करत असतात. अशाच प्रकारे तोंडलीकर नगर येथे राहणारी रानी देशमुख सुद्धा हा व्यवसाय करत होती भिशी लागलेल्या दुसऱ्या महिलेचे पेसै ती तिसऱ्या व्यक्तीस व्याजी देत होती, तिची ही उलाढाल अनेक  महिलांच्या अज्ञान पणाचा फायदा घेत होती.
        असे शेकडो महिलांचे कोट्यवधी रुपयांचे दागिने घेऊन ती शहरातील परप्रांतीय सराफा कडे गहाण ठेवत असे.त्यामध्ये तिने कोट्यवधी रूपये  गोळा केले आहेत व  तिने अनेक नातेवाईक महिलांचे काही कोटी रुपये सोन्याचे दागिने दोन चार दिवसांच्या बोलीवर घेतले आहेत असे असताना राणी देशमुख जेव्हा आपल्या राहत्या घरी दिसत नसल्याचे भिशी भरणाऱ्या महिलांच्या लक्षात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला असून तिच्या विरोधात मुरबाड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर  मुरबाड पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली व काही तासांत बाहेर पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या राणीला शोधून काढली आहे. एवढ्या मोठ्या रकमेची व शेकडो महिलांची फसवणूक एकटी राणी देशमुख करू शकते यावर लोकांचा विश्वास बसत नाही. कारण गेल्या पाच सहा दिवस चालेल्या या तपास मोहिमेत ठाणे मुंबई पालघर पुणे आणि दिल्ली पर्यंत राणीने व्यवहार केल्याचे स्पष्ट होत असल्याने, राणीने गोरगरीब महिलांना घातलेला हा गंडा ग्रामीण भागातील गल्ली पासुन दिल्ली पर्यंत पोहोचला असल्याचे उघड होत  आहे, या चक्रव्यूहात अनेक घरंदाज महिलांची नावे समोर येत असल्याने पोलिस दररोज अनेक महिलांना चौकशी साठी घेऊन येत असुन तासनतास रखडवुन चौकशी करत असले तरी आपल्या पतीला हा प्रकार समजला तर नसेल अशी चर्चा होत आहे,भिशी धारक महिला, पुरुष, आपली यातुन सहिसलामत सुटका होईल की नाही या तणावात दिसत आहेत.असे असताना मुरबाड मधिल परप्रांतीय सराफ शहरातुन भुमिगत झालेले असल्याने तपास लावणे मुरबाड पोलिसांसमोर आव्हान आहे,मुरबाड पोलीस स्टेशनचे पो.नि. संदिप गिते या गंभीर घटनेचा पुढील तपास करत असून लवकरच अन्य कोण साथिदार आहेत का? याचाही शोध घेतला जाणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान फसवणूक झालेल्या सर्व महिला सामान्य कुटूंबातील असून महिला घाबरल्या आहेत. आपले गेलेले लाखो रूपये व दागिने कसे परत मिळणार या विवंचनेत या महिला असून त्या महिले कडून लवकरात लवकर वसूल करावी अशी मागणी फसवणूक झालेल्या महिलांकडून होत आहे.ज्या सोनं विक्रेते दुकानात सोनं मोड केले किंवा गहाण ठेवले होते त्या सर्वावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरिक करत असून या गुन्ह्यांची चौकशी एटीएस मार्फत करावी तसेच काही श्रीमंतयोगीनी लाखो रुपये  या भिसी मध्ये गुंतवणूक केली त्याची चौकशी गुलदस्त्यात असल्यामुळे राज्याच्या गृह विभाग या कडे कधी लक्ष घालणार या चर्चा सर्वत्र सुरु आहे. मुरबाड मध्ये अनेक  गंभीर गुन्हे घडत असताना त्याची पारदर्शक चौकशी होणे गरजेचं आहे

--------------------------------------------------------------
          माझ्याकडे संबंधित महिलेने दागिने गहाण ठेवलेले आहेत.परंतु ते दागिने आम्ही बॅंकेत ठेवत असल्याने बॅंकेत असलेले दागिने मुरबाड पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्याचे पत्र मला पोलिसांनी दिले आहे. 

                                                                               राकेश चौधरी- अंबिका ज्वेलर्स,मुरबाड

No comments