web-banner-lshep2024

Breaking News

पनवेल तालुक्यातील मौजे आदई ,नेवाळी येथे बेकायदेशीर दगडखाणींचा कहर; आदिवासी बांधवांचा संताप..!

 

पनवेल (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात येणाऱ्या ग्रुप-ग्रामपंचायत आदई हद्दीतील आदई,नेवाळी गाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दगडखाणींमुळे स्थानिक आदिवासी बांधवांचे जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

    स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या दगडखाणींमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी व वायूप्रदूषण होत असून पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत तसेच त्यांचे पायवाट रस्ते खचून गेले आहेत व वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागीय शासकीय यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आदिवासी बांधवांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, काही प्रभावशाली व्यक्तींना पाठीशी घालून बेकायदेशीर दगडखाणी सुरू ठेवण्यात येत आहेत.

    त्यामुळे आदिवासी बांधवांचा प्रशासनावरील विश्वास ढासळत चालला आहे.आमचे पीण्याचे पाणीचे झरे बेकायदेशीर दगडखाण चालवून नस्ट केले आहेत. दरम्यान, वाघऱ्याची वाडी येथील स्थानिक आदिवासी बांधवांनी इशारा दिला आहे की, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा मार्ग स्वीकारतील. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बेकायदेशीर दगडखाणी बंद कराव्यात व संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि पिण्याचे पाणी व रस्ते तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.

No comments