अमली पदार्थ विरोधात राज्य सरकारचा मास्टर प्लॅन; मात्र मुरबाड मध्ये सुगंधित तंबाखू गुटखा विक्रीला यंत्रणेचा बगळ कारवाई शून्य..!
गौरव शेलार / मुरबाड : ड्रग्ज तस्करांविरोधात राज्य शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासन अंमली पदार्थां विरोधात ‘झिरो टॉलरन्स धोरण राबवणार आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यासह कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. नागपुर शहरातील मोतीबाग परिसरात सापडलेल्या ड्रग्ज तस्करांविरोधात झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे.
विधानसभेत मोतीबाग येथील ड्रग्स तस्करांच्या घरांवर छापे टाकून गांजा व अग्निशस्त्रांचा साठा जप्त करण्यात आल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत विकास ठाकरे, विक्रम पाचपुते आणि डॉ. नितीन राऊत यांनी सहभाग घेतला. प्रवीण दटके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, संबंधित प्रकरणात सामाजिक गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील टप्प्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
मात्र महाराष्ट्रात सुरू असलेल्या सुगंधित तंबाखू गुटखा यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी कारवाई करणार अशी चर्चा सुरू आहे.मुरबाड तालुक्यात राजरोसपणे सुगंधीत तंबाखू, गुटखा हे सर्रास विक्री केली जात आहे.त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून त्यावर राज्याचे मुख्यमंत्री कोणत्या पद्धतीची कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.सदरील सुगंधित तंबाखू, गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोकांतर्गत कारवाईसह आरोपींची संपत्ती जप्त करण्यासह कठोर कारवाई केली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



No comments