web-banner-lshep2024

Breaking News

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी चोरीला गेलेल्या नऊ तोळे सोन्याचा उलगडा लागला;आरोपी पोलिसांच्या पिंजऱ्यात...!

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड बस स्टॅन्ड येथून सारिका संजय घुडे या त्यांच्या मूळगावी उंबरपाडा या ठिकाणी साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त सरळगावच्या दिशेने बसची वाट पाहत उभ्या होत्या. मुरबाड बस स्टॅन्ड येथे सरळगावकडे जाणारी बस लागली श्रीमती घुडे या घाई गडबडीत गर्दीत बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी त्यांच्या जवळील पर्सची चैन उघडून पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरी करून चोरून नेल्याची तक्रार मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

     सदरील गुन्हा 21 डिसेंबर 2024 रोजी दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मालमत्तेचे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन धडाकेबाज अशी पोलीस खात्यात छाप असणारे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस स्वामी तसेच ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांना समांतर तपास करून मालमत्ते संदर्भातील दाखल गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आदेश देऊन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी वेगवेगळी पोलीस पथक तयार करून त्यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले.

    सदरील चोरीच्या बाबत कोणतेही धागेदोरे नसताना अथक परिश्रम घेऊन गुप्त बातमीदाराच्या मदतीने गुन्हा करणारे आरोपीचा शोध गुन्हे शाखेने घेतला. सदरील आरोपी महिला लक्ष्मी किसन जाधव रा.भांडुप मुंबई हिला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपासणी केली महिला आरोपीत यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील 9 तोळे 1.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास मुरबाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सोनावणे हे करत आहेत. सदरील गुन्ह्याची सखोल चौकशी करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉ. डी.एस स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, ठाणे ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, भाऊ गायकवाड ,पोलीस हवालदार सतीश कोळी, हेमंत विभुते ,गोविंद कोळी ,रवींद्र मोरे ,दीपक गायकवाड, तारवी, साळवे या पथकाने अथक परिश्रम घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कौशल्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 ठाणे जिल्ह्यामधील घडत असलेल्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून तो गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा नेहमीच असतो असे नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे. ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या धडाकेबाज निर्भीड निपक्ष असे पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी यांच्या कार्याची दखल गृह विभागाने घेऊन त्यांचा सन्मान राष्ट्रपती पुरस्काराने व्हावा अशी इच्छा तमाम नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments