web-banner-lshep2024

Breaking News

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण.. कपडे फाडले, लाथा घातल्या; सुरक्षा रक्षकाचा प्रताप

 

Trimbakeshwar Temple Video:  होळी, धुलिवंदनाच सण, सलग सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीला नियंत्रित करत सर्व भाविकांना दर्शन देताना देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकांची आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. अशातच त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

देवाच्या दारात भाविकाला मारहाण

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सुरक्षारक्षकाकडून एका भाविकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सुरक्षारक्षकाने या भाविकाचे कपडे फाडत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मंदिरातील एका भाविकाने या मारहाणीचा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे. या घटनेवरुन सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. 

व्हिडिओ व्हायरल, भाविकांचा संताप 

हा भाविक दर्शन रांगेत बसून जप करत होता, पुढे जाण्यास तयार नव्हता त्यामुळे सुरक्षारक्षक आणि त्याच्यामध्ये  वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांचा वाद आणि मारहाणीच्या घटना नित्याचाच झाल्या असून मंदिर संस्थानवर नियंत्रण कोणाचे ? हा प्रश्न पुन्हा उपस्थित आहे. 

No comments